(दृश्य:- मंदिराबाहेर)
(दोन मित्रांची अचानक भेट)
गौरव: अरे सागर,
सागर: (मागे वळून) अरे गौरव.
गौरव: कसा आहेस मित्रा?
सागर: एकदम मजेत, तू कसा आहेस आणि इकडे कसा काय? तुझा तर विश्वास नाही आहे ना देवावर.
गौरव: हो रे पण बायको मागे लागली म्हणून आलो.
सागर: बाकी नौकरी वैगेरे कशी चालू आहे.
गौरव: ठीक चालू आहे. जॉब चांगला चालू आहे. नवीन गाडी आणि घर घेतले आहे.
सागर: चला म्हणजे सर्व आनंदी आनंद आहे म्हणायचा.
गौरव: मित्रा कसली गर्दी आहे रे ह्या मंदिरात.
सागर: ही असली गर्दी पाहून मला तर असे वाटते की देवांमधेच आपापसात स्पर्धा चालत असेल की माझे clients जास्त की तुझे. आणि गणपती आणि बालाजी तर यात अगदी top वर असतील.
(दोघीही हसतात.....)
गौरव: नाही रे पण खरच सगळ्या वयोगटातील लोक दिसतात इथे.
सागर: बरोबर आहे तुझे , इथे सर्वांच फावतं.
गौरव: कस काय?
सागर: हे बघ, देवपूजेसाठी लागणाऱ्या सहित्यामुळे काही गरीब लोकांचे पोट भरते तर ब्राम्हणाचे दुसर्या प्रकारे (दिसते सुद्धा ) भरते .चोरांचा धंदा तेजीत चालतो. बायकांना काहीतरी मागायचे असते आणि नवरा बिचारा presenty लावत असतो.आणि तरुण पिढीला तेव्हडाच डोळ्याला आराम.
गौरव: आणि वृद्धांच?
सागर:अरे त्यानंतर जास्तच गरज आहे. असंही त्यांना लवकरच जायचे आहे देवाघरी , जरा jack (वशीला) लागला तर बरे.
आजोबा म्हणत असतील, स्वर्ग दे रे देवा (तरुणपणी साधे TV वर सुद्धा पाहायला न मिळालेले ) तेव्हडेच काय ते अप्सरांचे दोन चार item songs बघता येतील.
आजी म्हणत असतील, खूप राबले रे बाबा इथे , पहिले नवर्यासाठी नंतर मुलांसाठी, सुनांसाठी ते थेट आत्तापर्यंत( नातूंसाठी).Please नरकात टाकू नको रेदेवा, तिथे तरी थोडा आराम मिळू दे ( स्वर्गच दे)
(दोघेही हसतात .....)
सागर: तू काही मागतोस की नाही देवाकडे?
गौरव: अरे खूप मागितले , पण वाटते comman गोष्टी मागणाऱ्या लोकांकडे देव दुर्लक्ष करतो .
सागर: असे काय मागितले?
गौरव: काही नाही रे मनात इच्छा ठेवून गेलो की कोथरूड ला बंगला आणि एक मर्सिडीज पण चिंचवडचा flat आणि indica वर समाधान मानावे लागले.
सागर: (मनात हसून) अरे देवाने फसवले की रे तुला.
गौरव: तू आलास कसा आणि काही मागतोस की नाही देवाकडे?
सागर: बाबा,आपली अकरा नंबर बस (पायी) जिंदाबाद. आणि मागायचे मानशील तर माझे असे मत आहे की मला काही प्रत्येक वेळेस देवाची आठवण येत नाही. मग फक्त मला जेव्हा काही हवे असेल तर त्याला काही मागताना guilty feel होते.
सागर: बाबा,आपली अकरा नंबर बस (पायी) जिंदाबाद. आणि मागायचे मानशील तर माझे असे मत आहे की मला काही प्रत्येक वेळेस देवाची आठवण येत नाही. मग फक्त मला जेव्हा काही हवे असेल तर त्याला काही मागताना guilty feel होते.
गौरव: काहीही म्हण पण, ह्या मंदिरात प्रसाद फार छान मिळतो.
सागर: हो ना, मला तर आपल्याकडची नैवाद्याची पद्धत फार आवडते. सर्वात पहिले देवाला काय तो नैवद्य ठेवून त्याला म्हणत असतील, हा घे ...सर्वात पहिले तुलाच देतोय . हा घे आणि निवांत बस तुझ्या जागी.
सागर: हो ना, मला तर आपल्याकडची नैवाद्याची पद्धत फार आवडते. सर्वात पहिले देवाला काय तो नैवद्य ठेवून त्याला म्हणत असतील, हा घे ...सर्वात पहिले तुलाच देतोय . हा घे आणि निवांत बस तुझ्या जागी.
(दोघेही हसतात........ )
गौरव: अरे तुझी chillar party कितवीत आहे?
सागर: मोठा समुद्र पाचवीत आणि लहान जल तिसरीत आहेत. दोघेही Municipaltichya school मध्ये जातात.
गौरव: काय Municipaltichya school मध्ये .का रे job गेला की काय तुझा? माझा यश तर सहावीत जातो Loyola मध्ये.
सागर: तसे नाही रे आजकालच्या ह्या शिक्षणाच्या बाजारात, शिक्षक तर तसेही काही शिकवत नाहीत आणि जर गरज वाटलीच तर चांगली tuition आणि खेळासाठी चांगला sport club लावून द्येईल.
गौरव: ते ठीक आहे पण Municipalty school .... किती घाणयेर्दी असतात तिथली मुले(शी..). माझा यश तर मोठा डॉक्टर होणार आहे .बाबा मी Neurosurgeon होणार असे म्हणतो तो.आणि तुझी
(चेहरा पाडून) काय होणार आहेत?
सागर: मित्रा, ती मुले जरी घाणयेर्दी असली तरी, अंगावर घाण असलेली हि मुले दुषित मनापेक्षा
(मोठ्या school मधल्या) कधीही चांगली, नाही काय?........... आणि समुद्र आणि जल म्हणतात की, बाबा आम्ही मोठ्ठी माणसे घडवू. त्यांना शिक्षक व्हायचे आहे.
( पप्पा, दोन्हीही मागे वळून बघतात तर यश आणि त्याची आई दिसतात)
गौरव: चल येतो मी , आमची List ( देवाकडे मागितलेल्या गोष्टींची यादी) वाढलेली दिसते.
(दोघेही हसतात )
(आणि पडदा पडतो...................हाहाहाहा)
No comments:
Post a Comment