तुम्ही विचाराल, काय आहे ही चारची भाषा ?
अहो आपण म्हणतो ना , चार जणांची असते ती complete family .
लहान मुलं पहिले बोलायला शिकते ते चार शब्द ....आई आणि बाबा .
माणूस चार भिंतीत असला की त्याला सुरक्षित वाटतं..बहुतेक यालाच घर म्हणत असावेत .
चार चाकी गाडी चांगला
balance सांभाळते.
अहो एवढंच कशाला आपल्या शरीरातल्या पाच ज्ञानेन्द्रीयांपैकी . चारच एकमेकांजवळ असतात .
लोकांच्या त्या कट्ट्यावरच्या गप्पा बघून आपण म्हणतोच की ...काय चांडाळ चौकडी जमली आहे.
ह्यात आणखी भर म्हणजे ..दोनाचे चार हात होणे , चार दिवस सासूचे .. वगेरे.. वगेरे…
आपण आपल्या घराभोवती,शेताभोवती कायम बांधत असतो ते... .चौघी-बाजुंनी कुंपण .
मोठी लोकं ही ऐकवतात ..चार बुकं वाचली ... म्हणून जास्त शहाणा झालास काय ?
कधी स्वतःच्या तर कधी आज आपल्यात नसलेल्यांच्या आठवणी जपण्यासाठी ..............आपण चार चौकटीच्या फ्रेममध्ये जपत असतो ते फोटो.
चार- रस्त्यांच्या ....... चौकात लागतो तो signal.
माणसाचे आयुष्यही विभागलेलं असते त्या चार टप्प्यात ...बाल्यावस्था , तारुण्य , प्रौढत्व आणि वृद्धत्व .
अंत्ययात्रेला खांदा देतात .......ती सुद्धा चार माणसंच ना.....