About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Saturday, March 31, 2012

चार..... चार...........



तुम्ही विचारालकाय  आहे  ही चारची  भाषा ?
अहो  आपण  म्हणतो  ना ,  चार  जणांची  असते  ती  complete family .
लहान  मुलं पहिले  बोलायला शिकते  ते  चार  शब्द  ....आई  आणि  बाबा .

माणूस  चार  भिंतीत असला  की त्याला  सुरक्षित  वाटतं..बहुतेक यालाच  घर  म्हणत असावेत .
चार चाकी गाडी चांगला   balance सांभाळते.
अहो  एवढंच कशाला  आपल्या  शरीरातल्या  पाच  ज्ञानेन्द्रीयांपैकी  . चारच एकमेकांजवळ  असतात .

लोकांच्या  त्या  कट्ट्यावरच्या   गप्पा  बघून  आपण  म्हणतोच की ...काय  चांडाळ  चौकडी   जमली  आहे.
ह्यात  आणखी  भर  म्हणजे  ..दोनाचे  चार  हात  होणे  , चार  दिवस  सासूचे .. वगेरे.. वगेरे
आपण  आपल्या  घराभोवती,शेताभोवती  कायम  बांधत  असतो  ते... .चौघी-बाजुंनी कुंपण .

मोठी  लोकं ही ऐकवतात  ..चार  बुकं वाचली ... म्हणून  जास्त शहाणा  झालास  काय ?
कधी  स्वतःच्या   तर  कधी  आज आपल्यात नसलेल्यांच्या  आठवणी  जपण्यासाठी ..............आपण  चार  चौकटीच्या  फ्रेममध्ये  जपत  असतो  ते  फोटो.
चाररस्त्यांच्या ....... चौकात  लागतो  तो  signal. 

माणसाचे  आयुष्यही  विभागलेलं  असते   त्या चार  टप्प्यात ...बाल्यावस्था , तारुण्यप्रौढत्व आणि  वृद्धत्व .
अंत्ययात्रेला  खांदा  देतात .......ती  सुद्धा चार माणसंच ना.....