आजचा माणूस श्रीमंत होत चालला आहे हे खरे,
पण त्यासोबत तो काहीतरी (संवेदना ) हरवत चालला हेही मात्र तितकेच खरे.
अहो.... एकदा माणसाची श्रीमंती ठरवणार्या गोष्टींची यादी तरी करता येईल,
पण तो काय आणि किती गमावतो हे सांगणे जरा अवघडच आहे.
स्री ही पुरुषापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते,
आयुष्यात पुरुष शब्दांची (( विचारांची जुळवाजुळव करत असताना,
स्री आपले कार्य करून कधीच पुढे गेलेली असते.
सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा प्रवास झीजन्याचा असतो…..
कारण कोणी आपल्यासाठी आणि आपण कोणासाठी तेवत असतो,
सूर्यास्तापासून सुर्योदयापर्यंतचा प्रवास स्वप्नांचा असतो,
नवी दिशा ठरवणार्या क्षणांचा असतो.
माझ्यातला मी मला अनुभवयाचा आहे,
समाजाबाहेर जावून मला स्वप्नातला समाज घडवायचा आहे.
तुम्ही बनवलेल्या घरात प्रकाश, वारा हवा असेल तर खिडक्या,
दरवाजे गरजेचे असतात नुसत्या भिंती असून चालत नाही
आयुष्यातील प्रत्येक क्षण जगायचा असेल तर मन लागते नूसते.. हृदय असून भागत नाही.
No comments:
Post a Comment