About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Friday, July 20, 2012


फक्त  तुझ्यासाठी



तुझ्या  स्वागतासाठी ......   मी  हे  आकाश  विभाजीत  होतो
तुला  बघण्यासाठी   .........      मी तुझा चेहरा रवी- किरणांनी  उजाळीत होतो ,
तुला  हसवण्यासाठीच .....   मी  फुलांना  वाऱ्यावर खेळवीत  होतो .
तुला  बसण्यासाठी  .........       मी  ही धरती  पेलत  होतो .
तुझ्याशी  बोलतांना......     मी  आकाशाशी  नाते जोडत  होतो .
तू  जाताच ................     तो  सूर्यास्त  मला  नकोसा  होतो .

खरचं फक्त  तुझ्यासाठी ….       मी  उद्याची  वाट  बघत  होतो .........


तो बापड्या अन् ती माऊली


तो बापड्या अन् ती माऊली,
निर्मिली त्यांनी.......ती सावली

जरी भरउन्हात होती त्यांची पाऊले करपली.
तरी जिवापाड जपली त्यांनी......ती सावली

अंधार रात्र ज्यांनी डोळ्यात जागवली ,
तेव्हा कुठे शांतपणे निजली....... ती सावली.

बेरीज-वजाबाकीत त्यांनी... आपली आयुष्य खपवली,
बाकी कमवली जीने........ती होती सावली.

सर्व संकटात ती सोबत लढली,
पण कायम हसवत खेळवली ........त्यांनी ती सावली.

जेव्हा जेव्हा .....मंदिरात त्यांच्या घंटा वाजली ,
तेव्हा तेव्हा .......दर्शनाला उभी असेल का हो ती सावली ?

जग-रहाटीत आज ती दोघं कुठेतरी हरवली.
------  गवसेल का हो, त्यांना त्यांची.......ती सावली.