About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Sunday, June 10, 2012

माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार......(अपघाती मृत्यू )


काल हसलो काही क्षण  ज्यासोबत  ,त्याच्या   विस्तवाची राख  आम्ही  ह्याच  डोळ्यांनी  बघणार.
कितीही  सावरले  तरी  ... त्या थेंबानी आमचेही   चेहरे   भिजणार .
माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार. 

माथा  टेकवला  तू  ज्याच्या  पायावर,  वाट तुझ्या  परतीची  कधी ….. त्याच  चरणी  निजणार .
माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.

तुझ्या  मृत  देहास … एक ठराविक किंमत   सुद्धा कोणी  एक  पुढारी  ठरवणार .
त्याची  नोंद  कुठल्यातरी  सरकारी  फाईलीत … वर  आम्हीच  करणार ,
जन्म - मृत्युच्या  तारखेवरून  आम्हीच  तुझे  वय  ठरवणार .

माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.

तुझ्या  देहाला  मुक्ती  मिळावी म्हणून ..  आम्हीच  देवाकडे  प्रार्थना  करणार .
पण  तू  नसल्याची  खरी उणीव  फक्त  तुझे कुटुंबीयच  जाणणार,
दुखावलेली ती मने सुद्धा …..चिवटपणे  आयुष्याची  लढाई  पुनः नव्याने  लढणार ,

माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.




Sunday, June 3, 2012

देवाघरी  जाताना  प्रत्येकाकडे  एक  तरी  उत्तर  असावे

हे  जीवन  जगण्याचे  एकतरी  कारण  आपल्याकडे  असावे ,
देवाघरी  जाताना    एक  तरी  उत्तर  प्रत्येकाकडे असावे .


सूर्य  उगवण्याचे   कारण  कधीतरी  आपणही   असावे ,
आयुष्यात  हसताना  कोणीतरी  कायम  आपल्या  सोबतीला   असावे .
कळीचे  फुल  होतांना  काही  क्षण  आपण नक्कीच  अनुभवलेले  असावे ,

ह्या  वाटेवर  अनेक  रंगानी   भिजलेले  एक  शरीर   आपलेही  असावे ,

हे  जीवन  जगण्याचे  एकतरी  कारण  आपल्याकडे  असावे ,
एकतरी  पक्षाचे घरटे....  ह्या  हातांनी  बांधलेले  असावे ,

धडपडणाऱ्या  जीवास   मदतीसाठी  पुढे  झालेले   दोन  हात   आपलेही  असावे ,

देवाच्या  गाभाऱ्यात  दोन  फुलं….आपणही  अर्पण केलेले  असावे ,

हे  जीवन  जगण्याचे  एकतरी  कारण  आपल्याकडे  असावे ,

समुद्राचे  काठ  ह्या  पायांनी  अनुभवलेले  असावे .


ह्या  शरीरात  काही  श्वास हे ... अभिमानाने  जगलेले  असावे ,

देवाघरी  जाताना   एक  तरी  उत्तर  प्रत्येकाकडे असावे .