About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Monday, March 5, 2012

बघा...... काही आठवते का?


(पूर्वीचे प्रियकर ........आत्ताचे नवरा-बायको)

मी: प्रिये, तू आत्ता पूर्वीसारखी दिसत नाही.

ती:अरे मी तशीच दिसते... तशीच हसते , फक्त तुझी  नजर ते हेरत नाही.

मी आपण पूर्वीसारखे तासंतास गप्पा: मारत का   नाहीत ?
ती:केवळ एकमेकांचा आवाज ऐकण्यासाठी शब्दांना फारसे महत्व नसलेल्या ,त्या गप्पा........खरच आता करवत नाहीत.

मी: आपण पूर्वीसारखे फार हिंडतफिरत नाहीत.

ती: खरच अरेविनाकारण फिरणे आत्ता जमत नाही. 

मी:अग,आजकाल तुझे सौंदर्य फार वेगळे दिसते?

ती: हो रे......... आजच्या ह्या  नवनवीन  आव्हानांनी  ते अधिकच बहरलेले  असते .