खरंच.....आजकाल मी असा का वागतो?
आयुष्याच्या आरशात ,माझा चेहरा पुन्हा: पुन्हा: मलीन होतांना मी पाहतो ...
..खरंच.....आजकाल मी असा का वागतो?
एकाच खुर्चीतबसून मोठमोठ्या चर्चा करणाऱ्या मला, त्या खुर्चीचा मोह पुन्हा: तेथेच बसवतो ..
..खरंच.....आजकाल मी असा का वागतो?
काही स्वार्थी क्षणांसाठी सर्व तत्वे बाजूला ठेवत ह्या सर्वस्वाच्या बाजारात मी दररोज स्वतःला विकतो...
..खरंच.....आजकाल मी असा का वागतो?
दुर्दम्य उत्साह असलेल्या ह्या देहाला मी नेहमी थकव्याचे आमिष दाखवतो …
..खरंच.....आजकाल मी असा का वागतो?
Modern बनण्याच्या नादात मी माझ्या संस्काराची मुळे विसरतो....
..खरंच.....आजकाल मी असा का वागतो?
स्वतःसाठी झीजणारा हा देह ..... दुसऱ्यासाठी फक्त्त हळहळतो ...
..खरंच.....आजकाल मी असा का वागतो?
आजच्या ह्या rat-race मध्ये मी देहभान विसरून धावतो ...
..खरंच.....आजकाल मी असा का वागतो?
आज माझ्या ह्या घरात ......... मी एकटाच राहतो.......
.. खरंच.....आजकाल मी असा का वागतो?
No comments:
Post a Comment