About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Thursday, August 22, 2013

आमचं मुंबई-पुणे-मुंबई !!!!!

तुझ्या प्रेमाच्या आठवणीने माझे मन भरत नाही,
कारण आपली कालची भेट ...मला पुरतं नाही .........
आठवणींचा सहवास खूप वेळ असला तरी .............
तू इथे नाहीस......... हे काय मला कळत नाही ...........
Platformवरील ती मुलगी ..........

पाच वर्षाच्या मुलीला आई होतांना पाहिले  .........
खेळण्याच्या वयात तिला बहिणीला सांभाळताना पाहिले  .........
निरागस चेहऱ्यावर जबाबदारीचे भान दिसले.....
मला पाहताच तिला थोडे हसू स्मरले...........
अन्नाच्या शोधात तिच्या मातेला फिरतांना पाहिले.....
भूक मलाही होतीच की.............
पण त्यांची भूक शमली की नाही हे ...मला न कळले ....मला न कळले !!!!!!!!!!!
पाऊस माझ्याविना ............

कधीतरी तू माझ्याशिवाय पावसात भिजशीलच ना..........
पावसाला तुझा होकार कधीतरी देशीलच ना...........
आता नाहीये मी तिथे .......म्हणून नाराज होऊ नकोस .........
भेटू कि उद्या .........हे जग अजून संपलं तर नाही ना...........
             तुझ्या-सोबतीचा प्रवास..........

आयुष्याच्या प्रवासात मला तुझा सहवास लाभावा.....
दुखा:त मला.........तुझा हसरा चेहरा स्मरावा..........
ह्या हातांना फक्त ..........तुझा स्पर्श असावा ..........
अश्या तुझ्या सोबतीतच .........संपूर्ण आसमंत दिसावा.........
                    मुंबई लोकल ..........

पूर्वी माणसासाठी धावणारे आम्ही आज ट्रेन मागे धावतो आहे.....
एकमेकांना कायम लोकलमध्ये पाहणाऱ्या आम्हात मात्र शब्दांचा अभाव आहे....
कारण आमच्या मते न बोलण्यातच आमचा भाव आहे......
गाणी आणि रेल्वेचा आवाजच आमच्या कानात घुमतो....
खरं तर त्यातच आम्ही बोलणं विसरतो.....
लोकलची कमी-जास्त होणारी वेळच ......आमचा श्वास रोखते....
आम्ही घडवलेजीला (लोकलला) ....तीच आज आमचे पोट भरते......
यांत्रिक आयुष्यात आम्ही गुरफटून जातो..........
म्हणूनच हसण्यासाठी सुद्धा...........आम्हाला थोडा वेळ लागतो !!!!!!!!! 
           खास तुझ्यासाठी ..........

तुझ्या ह्या हास्याला माझेही साथ लाभू दे,
दुखा:त माझा आधार कायम तुझ्या सोबत असू दे ,
खरं तर जीवनाचा हा रंग....... तुझ्या चेहऱ्यावर असाच उजळू दे,
अश्या समाधानी मनाने जगणाऱ्या तुला....
माझीही, एक कुसं लाभू दे !!!!!!!!!!!

Thursday, August 1, 2013

            खरं तर तेव्हाच आम्ही जगलो होतो.....

पावसांत भिजलो जेव्हा.....मनसोक्त नाचलो तेव्हा.......
कधी आनंदात आम्ही हसलो होतो.....
       खरं तर तेव्हाच आम्ही जगलो होतो.....
एक नावं कागदाची त्या पाण्यावर माझीही होती .....त्या पावसांत ती भिजली होती....
ती पाण्यात बुडताच आम्ही थोडे हिरमुसले होतो .....पण लगेच दुसऱ्या खेळांत रमलो होतो.....
        खरं तर तेव्हाच आम्ही जगलो होतो.....
भिजलेल्या चपलांचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकत होतो....
कधी पावलांचे ठसे पाण्याने भरताना हसत होतो......
तुंबलेल्या पाण्याची वाट काडीने मोकळी करत होतो,
कळत-नकळत त्या धरणाचे गेट आम्ही उघडत होतो.......
असेही नवनवीन शोध आम्ही लावत होतो ........
       खरं तर तेव्हाच आम्ही जगलो होतो.....