फक्त तुझ्यासाठी
तुझ्या स्वागतासाठी ...... मी हे आकाश विभाजीत होतो
तुला बघण्यासाठी ......... मी
तुझा चेहरा रवी- किरणांनी उजाळीत होतो ,
तुला हसवण्यासाठीच ..... मी फुलांना वाऱ्यावर खेळवीत होतो .
तुला बसण्यासाठी ......... मी ही धरती पेलत होतो .
तुझ्याशी बोलतांना...... मी आकाशाशी नाते जोडत होतो .
तू जाताच ................ तो सूर्यास्त मला नकोसा होतो .
खरचं फक्त तुझ्यासाठी …. मी उद्याची वाट बघत होतो .........