माझा देव
----------------------------------------------------------------------------------------------------------
बालपणी मी लयात गायलो,मोकळ्या आभाळाखाली मुक्तपणे खेळलो.
तारुण्यात मी प्रेमात न्याहलो,अभ्यासरुपी ज्ञानसागरात बुडालो.
आयुष्याच्यामध्यावर ह्या जीवघेण्या शर्यतीत लढलो, भाकरीवजा आयुष्यासाठी खपलो.
वार्ध्यक्यात एकांतात रडलो ,हसलो…ओझे ह्या जीवनाचे एकटाच पेलत राहिलो.
माझ्यातला देव हरवला आहे.
या विशाल जनसमुदायात ,तो हरवला आहे.
त्याला सामावून घेणाऱ्या देहाच्या शोधात तो आहे.
आज कित्तेक दिवसानंतर तो मला दिसला आहे.
चल राहूया कि रे सोबत विचारता……. तो मलाच समजावतो आहे .......
अरे वेड्या, आज तूच हरवला आहेस...........
----------------------------------------------------------------------------------------------------------
तारुण्यात मी प्रेमात न्याहलो,अभ्यासरुपी ज्ञानसागरात बुडालो.
आयुष्याच्यामध्यावर ह्या जीवघेण्या शर्यतीत लढलो, भाकरीवजा आयुष्यासाठी खपलो.
वार्ध्यक्यात एकांतात रडलो ,हसलो…ओझे ह्या जीवनाचे एकटाच पेलत राहिलो.
तरी तू म्हणतोस की मी फक्त श्वासोश्वास घेत, देहाचे रुपांतर करत जगलो..
खरच का रे देवा...... हे आयुष्य नाही का रे मी समजलो ?
No comments:
Post a Comment