About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Saturday, August 18, 2012

त्याची ती अन तिचा तो............


     त्याची ती अन तिचा तो कधी झाले हे त्या दोघांना. ........खरंच आठवत नाही.
कधी आनंदात तर कधी दुखा:त एकमेकांना सावरत हे दोघे कधी मोठे झाले हे त्यांना आज स्मरत नाही.
कारण ती दोघं  तक्रारी आणि भांडणांच्या खोलीत  सहसा शिरत नाहीत.
        त्याची ती अन तिचा तो कधी झाले हे त्या दोघांना ........ खरंच  आठवत नाही.

तिच्या स्पर्शाने सुखावलेला तो अन त्याच्या स्पर्शाने लाजलेल्या तिचं                                                  नातं हे त्यापलिकडे कधी गेले हे त्यांना आठवत नाही.
सोबत सुरू केलेला हा भावनांचा प्रवास भविष्याकडे कधी वळला हे त्यांच्या  आज लक्षात नाही.
        त्याची ती अन तिचा तो कधी झाले हे त्या दोघांना ........ खरंच  आठवत नाही.

अहो , आसु आणि हसू हे त्या दोघांत कधी विभागता येतंच नाही.
यांत्रिक जगापलीकडे त्यांनी निर्मिलेले जग .... एक सामान्य नजर कधी बघूच शकत नाही...
     कारण.....त्याची ती अन तिचा तो कधी झाले हे त्या दोघांना.. ........खरंच आठवत नाही.



Friday, July 20, 2012


फक्त  तुझ्यासाठी



तुझ्या  स्वागतासाठी ......   मी  हे  आकाश  विभाजीत  होतो
तुला  बघण्यासाठी   .........      मी तुझा चेहरा रवी- किरणांनी  उजाळीत होतो ,
तुला  हसवण्यासाठीच .....   मी  फुलांना  वाऱ्यावर खेळवीत  होतो .
तुला  बसण्यासाठी  .........       मी  ही धरती  पेलत  होतो .
तुझ्याशी  बोलतांना......     मी  आकाशाशी  नाते जोडत  होतो .
तू  जाताच ................     तो  सूर्यास्त  मला  नकोसा  होतो .

खरचं फक्त  तुझ्यासाठी ….       मी  उद्याची  वाट  बघत  होतो .........


तो बापड्या अन् ती माऊली


तो बापड्या अन् ती माऊली,
निर्मिली त्यांनी.......ती सावली

जरी भरउन्हात होती त्यांची पाऊले करपली.
तरी जिवापाड जपली त्यांनी......ती सावली

अंधार रात्र ज्यांनी डोळ्यात जागवली ,
तेव्हा कुठे शांतपणे निजली....... ती सावली.

बेरीज-वजाबाकीत त्यांनी... आपली आयुष्य खपवली,
बाकी कमवली जीने........ती होती सावली.

सर्व संकटात ती सोबत लढली,
पण कायम हसवत खेळवली ........त्यांनी ती सावली.

जेव्हा जेव्हा .....मंदिरात त्यांच्या घंटा वाजली ,
तेव्हा तेव्हा .......दर्शनाला उभी असेल का हो ती सावली ?

जग-रहाटीत आज ती दोघं कुठेतरी हरवली.
------  गवसेल का हो, त्यांना त्यांची.......ती सावली.



 


Sunday, June 10, 2012

माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार......(अपघाती मृत्यू )


काल हसलो काही क्षण  ज्यासोबत  ,त्याच्या   विस्तवाची राख  आम्ही  ह्याच  डोळ्यांनी  बघणार.
कितीही  सावरले  तरी  ... त्या थेंबानी आमचेही   चेहरे   भिजणार .
माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार. 

माथा  टेकवला  तू  ज्याच्या  पायावर,  वाट तुझ्या  परतीची  कधी ….. त्याच  चरणी  निजणार .
माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.

तुझ्या  मृत  देहास … एक ठराविक किंमत   सुद्धा कोणी  एक  पुढारी  ठरवणार .
त्याची  नोंद  कुठल्यातरी  सरकारी  फाईलीत … वर  आम्हीच  करणार ,
जन्म - मृत्युच्या  तारखेवरून  आम्हीच  तुझे  वय  ठरवणार .

माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.

तुझ्या  देहाला  मुक्ती  मिळावी म्हणून ..  आम्हीच  देवाकडे  प्रार्थना  करणार .
पण  तू  नसल्याची  खरी उणीव  फक्त  तुझे कुटुंबीयच  जाणणार,
दुखावलेली ती मने सुद्धा …..चिवटपणे  आयुष्याची  लढाई  पुनः नव्याने  लढणार ,

माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.




Sunday, June 3, 2012

देवाघरी  जाताना  प्रत्येकाकडे  एक  तरी  उत्तर  असावे

हे  जीवन  जगण्याचे  एकतरी  कारण  आपल्याकडे  असावे ,
देवाघरी  जाताना    एक  तरी  उत्तर  प्रत्येकाकडे असावे .


सूर्य  उगवण्याचे   कारण  कधीतरी  आपणही   असावे ,
आयुष्यात  हसताना  कोणीतरी  कायम  आपल्या  सोबतीला   असावे .
कळीचे  फुल  होतांना  काही  क्षण  आपण नक्कीच  अनुभवलेले  असावे ,

ह्या  वाटेवर  अनेक  रंगानी   भिजलेले  एक  शरीर   आपलेही  असावे ,

हे  जीवन  जगण्याचे  एकतरी  कारण  आपल्याकडे  असावे ,
एकतरी  पक्षाचे घरटे....  ह्या  हातांनी  बांधलेले  असावे ,

धडपडणाऱ्या  जीवास   मदतीसाठी  पुढे  झालेले   दोन  हात   आपलेही  असावे ,

देवाच्या  गाभाऱ्यात  दोन  फुलं….आपणही  अर्पण केलेले  असावे ,

हे  जीवन  जगण्याचे  एकतरी  कारण  आपल्याकडे  असावे ,

समुद्राचे  काठ  ह्या  पायांनी  अनुभवलेले  असावे .


ह्या  शरीरात  काही  श्वास हे ... अभिमानाने  जगलेले  असावे ,

देवाघरी  जाताना   एक  तरी  उत्तर  प्रत्येकाकडे असावे .


Sunday, May 27, 2012


हमने कहा सपनोसे के तू खिल जा ,

उसने कहा हमसे ....... हो सके तो तू मुझे भूल जा


वो भी डटा रहा हमें भूलने की जिद पर……

और हम भी अढे रहे उसे जिन्दा रखने की जिद पर.


वो कहते हे मसे के.. आपकी आखोसे आपकी उम्र गुजर रही  है,

सच तो ये है के. उनको  जवां रखनेसेही  इन आखोकी रोनक बढ रही है .


पता है की ख्वाबोंपे इतना भरोसा  अच्छी बात नहीं.......

लेकिन क्या करे उनके बिना भी...... इन धडकनोंकी कोई क़ीमत नहीं.  

आज मी स्वतःशीच खूप भांडतो


आज   मी  स्वतःशीच  खूप  भांडतो .


हे  असेच  का.......  ते  तसेच  का  नाही ? 
हा  प्रश्न  मला  नेहमीच  सतावतो.
म्हणूनच   मी  स्वतःशीच  खूप  भांडतो........

आयुष्यात  दुखः आपले  साम्राज्य  वाढवीत   असताना,प्रत्येकाला  आनंदाचे खेळणे शोधताना पाहतो .
उद्याच्या  चिंतेत ......माझी  आजची  भूक  शमवताना ह्या  practical आयुष्यात  भावनेची  नाळ .... कुठेतरी  तुटतांना पाहतो
श्रीमंत  घरातली  मुले  बिघडलेली  असताना,झोपडीतल्या  मुलांना  सर्वांगाने मोठी होताना  पाहतो .
कधी  रक्ताच्या  थारोळ्यात  निष्पापतेचा  अंत ,तर  कधी  पैश्याचा  बाजार  बहरताना पाहतो .
एकीकडे  जीवन- मृत्युतले  अंतर  कमी  करणारे आम्ही….  आपापसातले   अंतर  वाढताना  पाहतो .
कुठेतरी  काहीतरी  चुकते  हे  जाणणाऱ्या  प्रत्येकाला,
......ह्या चुकीच्या  जगात कधी  निमुटपणे तर..कधी आनंदाने वावरतांना  पाहतो .

  म्हणूनच आज मी  स्वतःशीच  खूप  भांडतो........