देवाघरी जाताना प्रत्येकाकडे एक तरी उत्तर असावे
ह्या शरीरात काही श्वास हे ... अभिमानाने जगलेले असावे ,
हे जीवन जगण्याचे एकतरी कारण आपल्याकडे असावे ,
देवाघरी जाताना एक तरी उत्तर प्रत्येकाकडे असावे .
देवाघरी जाताना एक तरी उत्तर प्रत्येकाकडे असावे .
सूर्य उगवण्याचे कारण कधीतरी आपणही असावे ,
आयुष्यात हसताना कोणीतरी कायम आपल्या सोबतीला असावे .
कळीचे फुल होतांना काही क्षण आपण नक्कीच अनुभवलेले असावे ,
आयुष्यात हसताना कोणीतरी कायम आपल्या सोबतीला असावे .
कळीचे फुल होतांना काही क्षण आपण नक्कीच अनुभवलेले असावे ,
ह्या वाटेवर अनेक रंगानी भिजलेले एक शरीर आपलेही असावे ,
हे जीवन जगण्याचे एकतरी कारण आपल्याकडे असावे ,
एकतरी पक्षाचे घरटे.... ह्या हातांनी बांधलेले असावे ,
धडपडणाऱ्या जीवास मदतीसाठी पुढे झालेले दोन हात आपलेही असावे ,
देवाच्या गाभाऱ्यात दोन फुलं….आपणही अर्पण केलेले असावे ,
हे जीवन जगण्याचे एकतरी कारण आपल्याकडे असावे ,
समुद्राचे काठ ह्या पायांनी अनुभवलेले
असावे .
ह्या शरीरात काही श्वास हे ... अभिमानाने जगलेले असावे ,
देवाघरी जाताना एक तरी उत्तर प्रत्येकाकडे
असावे .
No comments:
Post a Comment