तो बापड्या अन् ती माऊली
तो बापड्या अन् ती माऊली,
निर्मिली त्यांनी.......ती सावली
जरी भरउन्हात होती … त्यांची पाऊले करपली.
तरी जिवापाड जपली त्यांनी......ती सावली
अंधार रात्र ज्यांनी डोळ्यात जागवली ,
तेव्हा कुठे शांतपणे निजली....... ती सावली.
बेरीज-वजाबाकीत त्यांनी... आपली आयुष्य खपवली,
बाकी कमवली जीने........ती होती सावली.
सर्व संकटात ती सोबत लढली,
पण कायम हसवत खेळवली ........त्यांनी ती सावली.
जेव्हा जेव्हा .....मंदिरात त्यांच्या घंटा वाजली ,
तेव्हा तेव्हा .......दर्शनाला उभी असेल का हो ती सावली ?
जग-रहाटीत आज ती दोघं कुठेतरी हरवली.
------ गवसेल का हो, त्यांना त्यांची.......ती सावली.
No comments:
Post a Comment