त्याची ती अन तिचा तो कधी झाले हे त्या दोघांना. ........खरंच आठवत नाही.
कधी आनंदात
तर कधी दुखा:त एकमेकांना सावरत हे दोघे कधी मोठे झाले हे त्यांना आज स्मरत नाही.
कारण ती दोघं तक्रारी आणि भांडणांच्या खोलीत सहसा शिरत नाहीत.
त्याची
ती अन तिचा तो कधी झाले हे त्या दोघांना ........
खरंच आठवत नाही.
तिच्या
स्पर्शाने सुखावलेला तो अन त्याच्या स्पर्शाने लाजलेल्या तिचं नातं हे त्यापलिकडे कधी गेले हे त्यांना आठवत
नाही.
सोबत सुरू
केलेला हा भावनांचा प्रवास भविष्याकडे कधी वळला हे त्यांच्या आज लक्षात नाही.
त्याची
ती अन तिचा तो कधी झाले हे त्या दोघांना ........
खरंच आठवत नाही.
अहो , आसु आणि हसू
हे त्या दोघांत कधी विभागता येतंच नाही.
यांत्रिक
जगापलीकडे त्यांनी निर्मिलेले जग .... एक सामान्य नजर
कधी बघूच शकत नाही...
कारण.....त्याची ती अन तिचा तो कधी झाले हे त्या दोघांना.. ........खरंच आठवत नाही.
No comments:
Post a Comment