काल हसलो काही क्षण ज्यासोबत ,त्याच्या विस्तवाची राख आम्ही ह्याच डोळ्यांनी बघणार.
कितीही सावरले तरी ... त्या थेंबानी आमचेही चेहरे भिजणार .
माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.
माथा टेकवला तू ज्याच्या पायावर, वाट तुझ्या परतीची कधी ….. त्याच चरणी निजणार .
माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.
तुझ्या मृत देहास … एक ठराविक किंमत सुद्धा कोणी एक पुढारी ठरवणार .
त्याची नोंद कुठल्यातरी सरकारी फाईलीत … वर आम्हीच करणार ,
जन्म - मृत्युच्या तारखेवरून आम्हीच तुझे वय ठरवणार .
माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.
तुझ्या देहाला मुक्ती मिळावी म्हणून .. आम्हीच देवाकडे प्रार्थना करणार .
पण तू नसल्याची खरी उणीव फक्त तुझे कुटुंबीयच जाणणार,
दुखावलेली ती मने सुद्धा …..चिवटपणे आयुष्याची लढाई पुनः नव्याने लढणार ,
माझ्या ह्या देशी लोकं असेही मरणार.
No comments:
Post a Comment