खरं तर तेव्हाच आम्ही जगलो होतो.....
पावसांत भिजलो जेव्हा.....मनसोक्त नाचलो तेव्हा.......
कधी आनंदात आम्ही हसलो होतो.....
खरं तर तेव्हाच आम्ही जगलो होतो.....
एक नावं कागदाची त्या पाण्यावर माझीही होती .....त्या पावसांत ती भिजली होती....
ती पाण्यात बुडताच आम्ही थोडे हिरमुसले होतो .....पण लगेच दुसऱ्या खेळांत रमलो होतो.....
खरं तर तेव्हाच आम्ही जगलो होतो.....
भिजलेल्या चपलांचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकत होतो....
कधी पावलांचे ठसे पाण्याने भरताना हसत होतो......
तुंबलेल्या पाण्याची वाट काडीने मोकळी करत होतो,
कळत-नकळत त्या धरणाचे गेट आम्ही उघडत होतो.......
असेही नवनवीन शोध आम्ही लावत होतो ........

No comments:
Post a Comment