About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Thursday, August 1, 2013

          आमच्या शाळेची ती एक भाषा..............

पाटीवरच्या रेघोट्याच्या त्या दिशा,
खडूने काढलेल्या त्या मिशा....
अशी होती आमच्या शाळेची ती एक भाषा.............

मण्यांची पाटी अंक मोजण्यासाठी,
गणिताची अवघड कोडं सोडवण्यासाठी ,
तरीदेखील चुकूनतरी उत्तर बरोबर येईल अशी आमची आशा ....

अशी होती आमच्या शाळेची ती एक भाषा.............

रोज सकाळी रस्त्यावर उड्या मारत शाळेत जाण्याची ती  नशा....
डब्यांच्या वाटाघाटीत एकाचा तरी नेहमीच होत असे हशा...
अशी होती आमच्या शाळेची ती एक भाषा.............

No comments:

Post a Comment