आजकाल मी फार चिडतो, पण स्वतःवरचा राग मी नेहमी दुसर्यावर काढतो,
माझ्याच वाटेवर एवढे काटे का? असा प्रश्न मला नेहमी पडतो , खरं तर मीच… चप्पल घालायला विसरतो.
जरा...... थांबलो असतो तर मनशांती न गमावता सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असती,
फक्त एका अंशाने अस्तित्व गमावलेला तो (पाण्याची वाफ झालेला तो थेंब )
कदाचित............सागर निर्मितीचा साक्षीदार झाला असता.
No comments:
Post a Comment