न थकणार्या ह्या डोळ्यांनी एका स्वप्नाचे सत्यात रुपांतर होतांना पाहिले आहे,
अंधाराला संपवत स्वतःच प्रकाशाची निर्मिती करणाऱ्या त्या हातांना मी पाहिले आहे.
ह्या तंत्रांमुळे संपूर्ण विश्वाचा माझ्या घरातला वावर मी पाहिला
आहे.
ह्या संशोधनाने दुर्दम्य व्याधींना संपवत, यमाला मोकळ्या हाती परततांना मी पाहिले आहे.
आज ह्या डोळ्यांनी मी पुन्हा:
एक नवे स्वप्नं पाहिले आहे.
साक्षरतेचे धडे गिरवत स्वतःचे भविष्य लिहिणारे, घरोघरात जन्माला आलेलं ते मुलं मला पाहायचं आहे.
प्रत्येकाला भरल्या पोटी, भरल्या देही स्वतःच्या झोपडीत निजतांना मला पाहायचं आहे.
माणसासाठी माणसाला झगडत, माणूसकीची नवी व्याख्या: रचतांना मला पहायची आहे.
आज ह्या मंदिरात माणसाची पूजा करणारी....... देवांची ती रांग मला पहायची आहे.
No comments:
Post a Comment