About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Friday, March 9, 2012

आई मी तुला मोठ्ठं होतांना पाहिले आहे


शिक्षणघेतांना आपल्या विरहाचे दुख: मी तुझ्या डोळ्यात पाहिले आहे.
अथक: परिश्रमाने...... खडतर परिस्थितीवर मात करणाऱ्या तुझा  ,
विद्यापीठाने गौरवलेला  फोटो मी पाहिला आहे.
आई मी तुला मोठ्ठं होतांना पाहिले आहे.

माझा प्रत्येक वाढदिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करताना मी तुला पाहिले आहे.
नुसत्या अस्तित्वाने संस्काराचे बाळकडू पाजताना मी तुला पाहिले आहे.
आई मी तुला मोठ्ठं होतांना पाहिले आहे.

कुटुंबाच्या प्रगतीसाठी सर्व भौतिक  सुखांचा त्याग करतांना मी तुला पाहिले  आहे.
सगळ्यांसाठी काहींना काही घेणाऱ्या तुला.... मी कित्तेकदा एकाच साडीत पाहिले  आहे.
भाजीवाल्या मावशींशी एक-एक रुपयासाठी झगडताना मी तुला पाहिले आहे.
आई मी तुला मोठ्ठं होतांना पाहिले आहे.

बिकट परीस्थीतीत मानसिक स्थेर्य  टिकवत लढणारा योध्या मी तुझ्यात पहिला आहे.
तुझ्या मनोबलापुढे   दुर्दम्य अशा आजाराला झुकतांना मी पाहिले आहे.
चापूलेसेगिरीच्या या दुनियेत , मी तुला स्पष्टपणे बोलतांना पाहिले आहे.
आई मी तुला मोठ्ठं होतांना पाहिले आहे.

कधीही कुठलाही न्यूनगंड न बाळगता , सर्वांच्या शिक्षणासाठी पुढे झालेला तो हात मी पाहिला आहे.
निस्वार्थीपणे दररोज पप्पांशी भांडताना मी तुला पाहिले आहे.
तुला काळजीने सांभाळणाऱ्या मावशीत खरे तर मी तुझेच प्रतिबिंब पाहिले आहे.
आई मी तुला मोठ्ठं होतांना पाहिले आहे.

खऱ्याखुऱ्या जीवनाचा अर्थ.... इतक्या  साध्यासोप्याप्रकारे आयुष्यात मांडताना मी तुला पाहिले आहे.
आई......... मी तुला मोठ्ठं होतांना पाहिले आहे.


माझा सर्वोत्कृष्ट प्रयत्न ................आईचे चित्र रेखाटण्याचा  

No comments:

Post a Comment